बिग बॉसचं घर म्हटलं की तिथं भांडणासोबत प्रेम प्रकरणही आलंच. बिग बॉसच्या कित्येक सीझनमध्ये जोड्या जुळताना तुम्ही पाहिल्या असतील. आता बिग बॉस हिंदीसह वेगवेगळ्या 6 भाषांमध्ये सुरू आहेत आणि त्यांची सोशल मीडियावर चर्चा होते आहे, व्हिडीओही व्हायरल होत आहेत. त्यापैकी काही व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. ज्यात बिग बॉसच्या घरात प्रेमात पडलेल्या कपल्सनी हद्द पार केल्याचं दिसतं आहे.
बिग बॉस बांग्लाच्या घरातील हा व्हिडीओ आहे. बिग बॉस बांगलामधील दोन स्पर्धकांनी अशा मर्यादा ओलांडल्या आहेत की, हा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओंमध्ये राजवीर डे आणि नंदिनी गुप्ता दिसत आहेत. राजबीर आणि नंदीनी सध्या ‘बिग बॉस बांग्ला’च्या घरात चर्चेचा विषय बनले आहेत. घरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली, हळूहळू प्रेमसंबंधात बदलली, आता मात्र ते खुलेआम रोमान्स करताना दिसत आहेत.
